*🚩मनीं मानव व्यर्थ चिंता वाहातें🚩*
*मनीं मानव व्यर्थ चिंता वाहातें ।*
*अकस्मात होणार होऊनि जातें ॥*
*घडे भोगणे सर्वही कर्मयोगें।*
*मतिमंद ते खेद मानी वियोगें ॥*
*👉🏻👉🏻👉🏻समर्थ रामदास*
*🚩👉🏻👉🏻या श्लोकात समर्थ म्हणतात, "माणसाला विनाकारण कुठल्यातरी गोष्टीची चिंता करण्याची सवय असते. जे व्हायचे असते ते आपल्या नियत गतीनुसार होत असते. मात्र माणुस उद्याची वा भविष्याची चिंता करण्यात आपला वर्तमान क्षण विनाकारण वाया घालवत असतो. असे अनेक लोक आपली बुद्धी वा सारासार विवेक या बाबी बाजुला ठेवतात की काय असे वाटते".🚩 🕉*
*🚩👉🏻👉🏻 माणसाला अस्वस्थ करणारी सर्वात महरत्त्त्वाची गोष्ट म्हणजे चिंता. चिंता करणे म्हणजे मृगजळाच्या प्रवाहातून नौका हाकण्यासारखे आहे. चिता आणि चिंता यामध्ये एका अनुस्वाराचाच फ़रक आहे. चिता माणसाला मृत्यनंतर एकदाच जाळते पण चिंता मात्र आयुष्यभर माणसाचे अस्तित्व पोखरीत राहते. लोक आपल्या वैयक्तिक, संकुचित सुख:दु:खात इतके अडकलेले असतात की, आपल्या सुकज-दु:खाच्या विणलेल्या जाळ्यात ते अडकून पडतात आणि विवेकाचा मार्ग चिंतेच्या डोहात डुंबत राहतात. 🕉🚩🔱*
*🚩👉🏻👉🏻चिंता हा एक माणसाने आपल्या मनाशी बाळगलेला भ्रम असतो. स्वप्नातल्या घटना त्या वेळी कितीही खर्या वाटल्या तरी जागेपणी स्वप्नातल्या त्या घटनांना काहीही अर्थ नसतो. चिंतेच्या बाबतीतही तसेच असते. चिंतेमुळे आपल्या हातात वर्तमानकाळतले जे सुकजाचे क्षण असतात त्यांचीही माती होऊन जाते. चिंतेच्या भ्रमात राहिल्यामुळे माणसाचे मन ऊगाचच दिशाहीन भरकटत राहते.🔱🕉🚩*
*🚩👉🏻👉🏻खरंतर विश्वातली घटना आपल्या निसर्गनियनानुसार वा केलेल्या कर्मानुसार घडत असतात. मात्र भविष्यात असं घडेल, तसं घडेल अशी काल्पनिक वा वांझोटी काळजी वाहण्यात काहीच अर्थ नाही. अशा व्यर्थ चिंता करणार्या चिंतातूर जनांची काळजी वाटते. म्हणून संतांनी चिंतेत बुडून जाणार्या लोकांना ईश्वरी चिंतनाचा सोपा मार्ग सांगितला आहे. मानवी मनाला हा चिंतनाचा मार्ग म्हणजे काळोख्या वाटेवरील प्रकाशासारखा आहे. संतांनी आपण ज्या भक्तीच्या चिंतनशील वाटेने वाटचाल केली त्याच वाटेने लोकांनी यावे, असा सदुपदेश केला.🕉🔱👏🏻*
*🚩👉🏻👉🏻समर्थ रामदास म्हणुनच सांगताहेत की माणुस दिवसरात्र जे चिंतेचे अोझे वाहतो त्याचा ऊपयोग काय ? माणसावर हळु पावलांनी एक ना एक दिवस काळाची झडप पडते. माणुस तू कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही. काळ आपले जाम योग्य वेळी योग्य प्रकारे अचूकपणे करीत असतो. म्हणुनच व्यर्थ चिंता करून आयुष्यातील बहुमोल वेळ बरबाद करण्यात काहीही अर्थ नाही., ही मगत्त्त्वाची बाब समर्थ रामदासांनी नेमकेपणाने सांगीतलेली आहे. चिंता करण्याऐवजी ईश्वरी चिंतन करावे आणि आपल्या आयुष्याची नौका योग्य दिषेने न्यावी, असा महत्त्त्वाचा हितोपदेष समर्थ रामदासांनी केला आहे.🕉🚩🔱🙏🏻*
*👉🏻👉🏻अमोल डोके👏🏻👏🏻*
*🕉🔱🚩🙏🏻जय जय राम कृष्ण हरि.पांडुरंग हरि.वासुदेव हरि🕉🔱🚩🙏🏻*
No comments:
Post a Comment