करिता विचार सापडले वर्म ।

_*🚩करिता विचार सापडले वर्म🚩*_
_*करिता विचार सापडले वर्म ।*_
_*समुळ निश्रम परिहाराचे ॥*_
_*मज घेऊनिया आपणांसी द्यावे ।*_
_*साठी जिवे भावे नारायण ॥*_
_*उरी नाही मग पडदा का आला ।*_
_*स्वमुखेचि भला करिता वाद ॥*_
_*तुका म्हणे माझे खरे देणे घेणे ।*_
_*तुम्ही साक्षी जाणे अंतरीचे ॥*_
_*👉🏻👉🏻👉🏻संत तुकाराम👏🏻*_ 🚩🚩
_*👉🏻या अभंगात संत तुकाराम म्हणतात,  "हे देवा, कितीही शोध घेतला तरी श्रमांचा परीहार करण्यासारखे तुझ्याशिवाय अन्य काहीही वर्म मला सापडत नाही. तू एकमेव असे विश्रांतिस्थान आहेस. हे नारायणा, माझ्या जिवाभावाचा मोबदला म्हणून तू माझा हो. मला तुझ्यात मिसळुन घे.  हे देवा, आपल्या दोघांत जर वेगळेपणा नाही, तर हा मायेचा पडदा मध्ये  काय येतो ? तू स्वता:च या वादाचा निवाडा कर.  माझा जीव तुला अर्पण करणे व मला तुझी प्राप्ती होणे हा देवघेवीचा व्यवहार सचोटीचा व खरा आहे.  याला पुरावा तूच आहेस.  कारण तू अंतरसाक्षी आहेस."*_ 🕉️🚩
_*👉🏻संतांच्या विश्रांतीचा ठावो म्हणजे पंढरपूरचा श्रीविठ्ठल.  विठ्ठलाशिवाय श्रमपरिहार करणारे इतर कुठलेही साधन नाही, असे तुकोबाराय म्हणतात.  संत तुकारामांनी देवाशी केलेल्या देवघेवीच्या व्यवहाराबाबत लिहले आहे.भक्ताने आपले सर्वस्व देवाच्या चरणी अर्पण करायचे. आपला जीवच जणू अोवाळून टाकायचा. याचा मोबदला म्हणून विठ्ठलाने भक्ताला काय द्यायचे ?  त्याने पूर्णपणे भक्तांचे होऊन जायचे. भक्तात मिसळून जायचे वा भक्तरूपच व्हायचे.*_ 👏🏻🔱 
_*👉🏻हा व्यवहार प्रामाणिकपणाचा आणि मनःपूत भक्ती प्रेमाचा आहे.  इतके सारे असताना मायेचा पडदा दोघांमध्ये आडवा का येतो हा सवाल तुकोबारायांनी देवाला विचारला आहे.*_  🕉️⚜️

_*👉🏻भक्त आणि देवाचे हे नाते मन:पूत आहे. येथे दोघेही या भक्तीप्रेमाचे साक्षी आहेत आणि तेच पुरावाही आहेत.  दोघांच्या संबंधांच्या मध्ये येणाऱ्या मायेचे आवरण  देवानेच दूर करावे असे तुकोबाराय देवाला साकडे घालीत आहेत. विठ्ठल सर्वसाक्षी आहे आणि या संभ्रमित अवस्थेतून तोच मार्ग काढेल याची तुकोबारायांना पूर्ण खात्री आहे.*_ 🚩🚩 
_*👉🏻संत तुकारामांचा व्यवसाय होता वाण्याचा.  त्यामुळे देवघेवीचा व्यवहार, मोबादला इत्यादी शब्द त्यांच्या अभंगवाणी स्वाभाविकपणे येतात. याचप्रमाणे "संत सेना" यांच्या अभंगात, ""आम्ही वारिक वारीक ।  करू हजामत बारीक ॥"" असा उल्लेख येतो. "संत सावतामाळी"   ""कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥"" या शब्दात विठ्ठलाचा अनुबंध मांडतात,  तर   ""देवा तुझा मी सोनार"" असे संत नरहरी सोनार म्हणतात.  संतांच्या अभंगवाणीत आपापल्या व्यवसायाचा उल्लेख  अगदी सहजपणे आले आहेत.*_ 🕉️🕉️ 
_*👉🏻विठ्ठलाविषयी आपला मनोभाव अनेक संतांनी आपल्या अभंगवाणी मांडला आहे.  संत नामदेव म्हणतात,---*_ 
    _*वेदांसी अगोचर परब्रह्म कारण ।*_
    _*योगिया हृदयीचे ममत्व निर्वाण ॥*_ 
    _*आकळू न कळेची शेखी धरियेले मौन ।*_
    _*ते रूप पंढरीये विटे समचरण ॥*_
    _*कानडा विठ्ठल तो उभा भीवरे तीरी उभा ।*_
    _*भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी ॥*_
   _*👉🏻संत चोखामेळा म्हणतात,----*_ 
    _*बहुतांचे धावणे केले बहुतावरी ।*_
    _*उदार श्रीहरी वैकुंठीया ॥*_
     _*तोची महाराज चंद्रभागे तीरी ।*_
    _*उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥*_ 
_*👉🏻आपल्या अवघ्या चिंतनाचे सार म्हणजे विठ्ठल हे तत्व संत तुकोरायांनी या अभंगाद्वारा मांडले आहे.👏🏻🚩*_
_*👉🏻👉🏻👉🏻अमोल डोके👈🏻👈🏻👈🏻*_
_*🕉️🔱⚜️💐👏🏻🚩🌺जय जय राम कृष्ण हरि.पांडुरंग हरि.वासुदेव हरि🕉️⚜️🔱💐👏🏻🚩🌺*_
🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...