अनुतापे दोष l जाय न लागता नमिष ll

 अनुतापे दोष l 
जाय न लागता निमिष ll
परि तो राहे विसावला l 
आदी अवसानी भला ll
हेंचि प्रायश्चित्त l 
अनुतापी न्हाय चित्त ll
तुका म्हणे पापा l 
शिवो नये अनुतापा ll 
      आपल्या हातून घडलेल्या वाईट कर्मांचा अथवा चुकांचा आपल्याला मनापासून पश्चात्ताप झाला तर त्यांचा दोष क्षणात नाहीसा होतो.परंतु आपल्याला झालेला पश्चात्ताप आपल्या मनामध्ये सदैव जागृत रहिला पाहिजे म्हणजे तेच पाप किंवा तीच चुक आपल्याकडून पुनश्च होणार नाही.

पश्चात्तापाच्या जलामध्ये स्नान करून चित्त परिशुध्द होणे हेच खरे प्रायश्चित्त होय.

तुकाराम महाराज म्हणतात की एकदा का पश्चात्तापाने मन मोकळे होउन पुन:श्च स्थिर झाले की मग पाप त्याला स्पर्श देखील करू शकणार नाही.

*हेच भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुकांमधून शिकत जाणे होय.*

*🙏 जय जय  राम कृष्ण हरी 🙏*

*आलीया संसारा उठा वेग करा!*
*शरण जा उदारा पांडूरंग!!1!!*

*देह हे काळाचे धन कुबेराचे!*
*तेथे मनुष्याचे काय आहे!!2!!*

*देता देवविता नेता नेवविता!*
*येथे याची सत्ता काय आहे!!3!!*

*निमित्याचा धनी केला असे प्राणी!*
*तुका म्हणे  म्हणोनी व्यर्थ गेला!!4!!*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय*

प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला *जगद्गुरू तुकोबाराय यांचा* चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे !!

*या अभंगात तुकोबाराय म्हणतात ,*

*आलीया संसारा उठा वेग करा !*
*शरण जा उदारा पांडूरंग!!*

*अरे बाबा या संसारात आल्यानंतर तु भगवंताला शरण जाऊन सतत भजन- कीर्तन- जागरण- आराधना -उपासना तनमन एकाग्र चित्ताने मनोभावे पूजा अर्चना करून संसार सुखाचा करून घ्यावे !!.......संसारी असावे असोनि ..नसावे भजन करावे सावकाश .....संसारातून तरूण जाण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे ! पक्षी अंगणी उतरी ते गुंतूनीया राहती तसे आपण संसारात पक्षा प्रमाणे राहावे आणि भगवंताचे नामस्मरण करत देवाला आपलेसे करून घेण्यासाठी भक्तीचा मार्ग निवडला पाहिजे! क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू!*....... नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान..... बाबारे हा देह नाशिवंत आहे . शाश्वत सत्य काय आहे तर ते भगवंताचे नामस्मरण विठ्ठलाचे भजन!!

 *म्हणून तुकाराम महाराज अभंगाचे दुसर्‍या चरणात म्हणतात ,*

*देह हे काळाचे धन कुबेराचे!*
*तेथे मनुष्याचे काय आहे!!2!!*

*सिध्दीबुध्दी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधुसंगे ! असे माऊलीने वर्णन केलेत !!कारण..... हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म चिकटाचा सांजा .....हा देह नश्वर आहे ! क्षणभंगुर नाही भरवसा ....देह आपला म्हणावे तर याला काळ घेऊन जाणार आहे ! मग धन कुणाचे तर ते कुबेराचे आहे!* मग येथे आपले काय आहे ? आपल्याला देवानी कोटी रूपयांचे नरदेह दिले आहे. या देहाचे सार्थक करून घ्यावे असे वाटत असेल तर आपण काय करावेत ? तर त्या परम पिता पंढरीनाथ भगवान याचे सतत नामस्मरण करत राहावे. कारण तो परमात्मा विठ्ठल तारणहार आहे . 

*म्हणून तुकोबाराय  अभंगाचे तिसऱ्या चरणात म्हणतात ,*

*देता देवविता नेता नेवविता!*
*येथे याची सत्ता काय आहे!!*

*देणारा भगवान परमात्मा आहे आणि नेणारा सुध्दा भगवान परमात्माच आहे ! येथे आपले काहीच नाही !!कालगती कोणालाही चुकली नाही. संताला सुध्दा कालगती सोडली नाही ; मग तुम्ही आम्ही तर सामान्य आहोत . कारण करता करविता तोच भगवान परमात्मा आहे . चाले हे शरीर कोणाचिया सत्ते कोण बोलावितो हरी विण म्हणून आपण भेदभाव न करता भजावे त्या हरीहरासी...... पवित्र अशी तुळशीची माला धारण करून भक्तीचा महिमा गात राहवे! कारण  मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते असे हे महान संत महात्मे आहेत . त्यांच्या सहवासात राहिल्याने आमचे उद्धार तर होतेच पण आमच्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही! म्हणून येथे आपले भगवंता शिवाय कोणी नाही! तुच बुध्दी देणारा पंढरीश पाडूरंग जगजेठी विठ्ठल आहे . त्यांची मनोभावे भजन कीर्तन करावे मग तो होऊ नेदी शीण आपले सर्व मनोरथ पुर्ण करतो ! अंतरीची घेतो उढी बाहेर धाकोटी मुर्ती उभा भगवंत*... हा भावाचा भुकेला आहे . येथे त्यांची सत्ता चालते म्हणून त्यांचे सतत नामस्मरण करत राहिले पाहिजे !!

*म्हणून तुकोबाराय अभंगाचे शेवटच्या चरणात म्हणतात ,*

*निमित्याचा धनी केला असे प्राणी!*
*तुका म्हणे म्हणोनी व्यर्थ गेला!!*

*आपण येथे निमित्त मात्र आहोत. उगीचच नानाविध ठिकाणी सुख शोधत बसण्यापेक्षा त्यात काय फायदा ? जर आपण त्यांच्या भक्तीत रंगून गेले तर आपल्या जीवनाचे उध्दार होईल! घर माझे ...बायको माझी.... मुलगा माझा ....असे समजून संसारात गुरफटून गेलोय ! पण हे केवळ मायेचा बाजार आहे ! म्हणून माझं या जगात भगवंता शिवाय कोणी नाही !! विठू तुझे माझे राज्य नाही दुसर्‍याचे काज!...... पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीयेला डोळा बाई ये ....हो वेधले हो मन त्याची ये गोडी .....आपले या जगात फक्त भगवंत आहे ! निर्वाणी गोविंद असे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलीया आघात निवाराया .....म्हणून आपण माझे माझे म्हणून व्यर्थ भटकंती करून घेण्यापेक्षा भगवंताचे निस्वार्थीपणे नामस्मरण केले तर या नरदेहाचे सार्थक होईल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात !*
⛳🐚⛳🐚⛳🐚⛳🐚⛳🐚⛳
*🌸 🌹*🚩

     *देवा आतां ऐसा करीं उपकार।*
     *देहाचा विसर पाडीं मज।।१।।*

     *तरीच हा जीव सुख पावे माझा।*
     *बरें केशीराजा कळों आलें।।२।।*

     *ठाव देईं चित्ता राखें पायांपाशीं।*
     *सकळ वृत्तीसी अखंडित।।३।।*

     *आस भय चिंता लाज काम क्रोध।*
     *तोडावा संबंध यांचा माझा।।४।।*

     *मागणें तें एक हेंचि आहे आतां।*
     *नाम मुखीं संतसंगदेई।।५।।*

     *तुका म्हणे नको वरपंग देवा।*
     *घेईं माझी सेवा भावशुध्द।।६।।*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
        देवा,मला देहाचा विसर पाडा,येवढाच उपकार तुम्ही मजवर करा.*
     *हे केशीराजा,तरच माझ्या जीवास सुख प्राप्त होईल,हें मला चांगलें कळलें आहे.*
     *सर्व इंद्रियवृत्तींसहवर्तमान माझ्या चित्ताला तुमचे पायांपाशीं आश्रय द्या व सर्व काळ त्या ठिकाणीं रक्षण करा.*
     *आशा,भय,चिंता,लज्जा,काम व क्रोध ह्या वृत्तींचा व माझा संबंध तोडा.*
     *तुमचेजवळ आतां एवढेंच मागणें आहे कीं आमच्या मुखानें नाम यावें व आम्हांला संतसंगति घडावी,इतकी देणगी द्या.*
     *तुकाराम महाराज म्हणतात,हे देवा, माझ्याकडून बहिरंग सेवा (वरपांगी,दांभिकपणाची)न घेतां शुध्दभावाची अशी अंतरंग (अंत: करण्यापासून) सेवा घ्या.*
   *🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*
   *⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳*
    *💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...