" .💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢🍀
🙏🏻🌺 *!! श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन प्रवचन सेवा !!* 🌺🙏🏻
------------------------------------
*३० एप्रिल जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥*
जोंवर धरिली जगाची आस । तोंवर परमात्मा दूर खास ॥
परमात्म्याची प्राप्ति । न होई राखता विषयासक्ति ॥
जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले ते घातासी आले ॥
विषयी एकजीव झालो जाण । सुटता न सुटे आपण जाण ॥
मान, अपमान, जगाचे सुख-दुःख । हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥
अभिमानांत परमात्म्याचे विस्मरण । हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥
सुख-दुःख, विपत्ति-आपत्ति, । ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥
आत्मनिश्चय बाणल्यावांचून माया न हटे न सुटे जाण ॥
आता करी शूर मन । मायेसी हटवावे आपण ॥
जैसें जैसें बाहेर दिसलें । त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥
एकच वस्तूची ओळखण जाण । पूर्ण होते समाधान ॥
ज्याच्यांत मानावे मी सुख । त्याच्यातच उद्भवतें दुःख ॥
नराचा होय नारायण । जर न चुकला मार्ग जाण ॥
जेथे ठेवावी आस । त्याचे बनावें लागते दास ॥
देह तो पंचभूतांचा । त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥
मी तुम्हांस सांगतो हित । दृश्यांत न ठेवावें चित्त ॥
दृश्य वस्तु नाशिवंत असते । भगवत्कृपेने समाधान येते ॥
परिस्थिति नसे बंधनास कारण । असे आपलेच मनाची ठेवण ॥
देवास पाहावें ज्या रीतीनें । तसाच तो आपणास दिसतो जाण ॥
विषयाचा नाही झाला जोंवर त्याग । तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥
आपलें प्रेमयुक्त चाले धणी । त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥
द्रव्यदारावर्जित जाण । ही खरी संताची खूण ॥
सृष्टी पाहावी भगवदाकारी । प्रेम ठेवील त्याचेवरी । त्याला नाही दुसरी सरी ॥
आल्यागेल्यास द्यावे अन्नदान । मुखानें भगवंताचें नाम ॥
हृदयांत रामाची प्रीति । यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥
न धरावी जगाची आस । तोच होऊ पाहे रामदास ॥
नामांत संत । नामीं भगवंत ॥
वृत्ति राखावी अत्यंत शांत । हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥
जेथे भगवंताचें नामस्मरण । तेथे सर्व संतांचें ठाण ॥
अगरबत्ती जळून गेली । परि सुवासाने राहिली ॥
तैसी रामचरणी झाले जे लीन । तेच खरे जिवंत जाण ॥
संतचरणीं झाला लीन । त्याला भाग्यास नाहीं दुजें उणें ॥
संताची संगति । भगवन्नामानें साधतें ॥
*१२१. देहासकट माझा प्रपंच । रामा केला तुला अर्पण ॥ ऐसें वाटत जावें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥*
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃
No comments:
Post a Comment