*अहंकार गेला | तुका म्हणे देव झाला*
मंडळी देव शोधण्या करता वनात जाव लागत नाही
*नलगती सायास जावे वनांतरा | सुखे येतो घरा नारायण ||*
डोंगरात जाऊन तप करावे लागत नाही
फक्त अहंकार रहित व्हा देव मिळेल
शेवाळ बाजुला करा स्वच्छ पाणी मिळेल
राख बाजूला करा विस्तव मिळेल
आकाशातील ढग बाजुला झाले की सुर्य दिसेल
डोळ्यात आलेला मोतीबिंदू चा पडदा बाजुला केला दृष्टी मिळेल
तसेच अहंकार दुर करा देव मिळेल
देव आपल्यातच आहे परंतु चित्तावर आलेला अहंकार रूपि मळ काढा
*तुका म्हणे चित्त करारे निर्मळ |येऊनी गोपाळ राहे तेथे ||*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
No comments:
Post a Comment