सत्व म्हणजे काय ?


*सत्व म्हणजे एखाद्या गोष्टीतील नको असलेला भाग काढून जे शुद्ध स्वरूप उरते ते सार. धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे; त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती (रजोगुण) आणि विकारांचे पाकड (तमोगुण) हे आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून काढून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सत्वगुणच. त्याला संत समाधान असें म्हणतात. आणि ते सत्व मिळवण्यासाठी विवेकाची चाळणी अन् भगवंताच्या स्मरणाचा हस्तस्पर्श अत्यंत जरूर आहे!*

*।।श्रीराम जयराम जय जय राम।।*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...