अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥
बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥
बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥
वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
अर्थ :- संसाराचे भय मानी बाळगुण जे साधक 'जगजेठि' अशी भगवंताला आर्ट स्वरात साद घालतात, त्यांच्या प्रपंच्याचे दुःख सरते ।।1।।
सर्व बलवानांमध्ये हां देव श्रेष्ट आहे. साधकांची आर्त हाक ऐकून तो उत्साहाने धाव घेतो. आळस करात नाही ।।ध्रु।।
शरण जाणार्यांना मोठे सामर्थ प्राप्त होते. माझा स्वामी साधकांना कसलिच चिंता पडू देत नाही. हा भगवंत साधकाला संतांच्या पंगतित बसवातो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, हा भगवंत साधकाला स्वताच्या खांद्यावर घेतो, त्याला कष्ट पडू देत नाही. स्वतः एरझारया घालतो व त्याला नीजस्वरूपाच्या घराला पोहचवितो. त्या भक्तताचे बोबडे बोल त्याला खुप आवडतात ।।3।।
#राम_कृष्ण_हरी_विठ्ठल_केशवा।
No comments:
Post a Comment