ते नाम सद़्गुरु कृपेविना कोणा । साधितां साधेना जपें तपें ।।
--- संत नामदेव महाराज
"करितां हे वेदाध्ययन ज्योतिष । नामाचा तो लेश न ये हातां ।।१।।
बहुत व्युत्पत्ति सांगती पुराण । व्यर्थ ते स्मरण नाम नोहे ।।२।।
अनंत हे नाम जयांतूनि आलें । त्यांतचि विरालें जळी जळ ।।३।।
ते नाम सद़्गुरु कृपेविना कोणा । साधितां साधेना जपें तपें ।।४।।
नामदेव म्हणे स्वतः सिध्द नाम । गुरुविण वर्म हातां न ये ।।५।।"
-----------------------[] संत नामदेव महाराज [] -----------------------
वारकरी संप्रदायाच्या उपासना पध्दतीचा आणि तत्त्वज्ञानाचा पायाच मुळी "नाममहात्म्य" आहे. यासाठी गुरुचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. याचे समर्थन वारकरी संत करतात. असे मार्गदर्शक गुरु सहजा सहजी उपलब्ध नसले तरी योग्य सद़्गुरू मिळू शकतात.
भक्तीमार्ग अनुसरायचा तर पुराणांचे ज्ञान व गुरुचे मार्गदर्शन आवश्यक त्याशिवाय मुक्तीही प्राप्त होऊ शकत नाही.
पुराणे नि त्यांचा एवढा प्रचंड विस्तार त्याचे ज्ञान मिळविण्या इतका वेळ देणे शक्य नसते. त्यातच प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडतानांच थकून जातो.
म्हणून स्वतःचा उध्दार करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे गुरुने दिलेल्या बीजमंत्राचा जप करावा. कारण ईश्वराचे नाम स्वतःसिध्द असते.असे संत नामदेव महाराज सांगतात.
No comments:
Post a Comment