एकाचिये सोई कवित्त्वाचे बांधे ।


एकाचिये सोई कवित्वाचे बांधे 
बांधिलिया साधे काय तेथें ॥१॥ 

काय हातीं लागे भुसाचे कांडणीं 
सत्यासी दाटणी करुनि काय ॥२॥ 

कवित्वाचे रूढी पायां पडे जग 
सुखावोनि मग नरका जाय ॥३॥ 

तुका म्हणे देव केल्याविण साहे 
फजिती ते आहे लटिक्या अंगीं ॥४॥

एखाद्या माणसाने काव्य केले, ते पाहून दुसरा उगीच त्याची नक्कल करू लागला, तर त्याला काव्य करणे साधणार आहे काय ? 
भुसा कितीही कांडला तरी त्यातून काय निष्पन्न होणार ? 
 सत्याची नक्कल केल्यावर पदरात काय पडणार ? 
कवित्व अंगी असल्यामुळे जग चरणावर माथा ठेवील,  त्यामुळे क्षणिक सुख लाभेल;  परंतु शेवटी नरकात जावेच लागेल.  देवाची कृपा असल्याशिवाय खोटेपणाने कवित्व करणाऱ्याच्या वाट्याला फजितीच येते असे तुकोबा म्हणतात.

🚩                         
    न बोलावे परी पडिला प्रसंग।
    हाकलिते जग तुझ्या नामे।।१।।
    लटिकेची सोंग मांडिला पसारा।
    भिकारी तू खरा कळो आले।।२।।
    निलाजरी आम्ही करोनिया धीर।
   राहिलो आधार धरूनिया।।३।।
   कैसा नेणों आता करिसी शेवट।
   केली कटकट त्याची पुढें।।४।।
   तुका म्हणे कांहीं न बोलसी देवा।
  उचित हे सेवा घेसी माझी।।५।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
     --->> देवा, तुझ्याबरोबर बोलू नये, पण प्रसंग पडला म्हणून बोलतो ते असे, की सर्व जग रडत,ओरडत आहे.
     त्याचे कारण (भक्त-काम-कल्मद्रुम इत्यादि  स्वत:ला म्हणविणारा) सोंगाड्या खोटा असा तू सर्व पसारा मांडला आहेस, म्हणून तू भिकारी आहेस (तुझ्याजवळ काही नाही)असे आम्हाला निश्चयाने समजले.
     तुझ्या आश्रयाने आम्ही धीर धरून राहिलो ते केवळ निलाजरे म्हणून.
     तुझ्यापुढे आम्ही आजपर्यंत जी कटकट केली तिचा शेवट तू कसा करशील हे आम्हाला काही कळत नाही.
     तुकाराम महाराज म्हणतात,हे देवा,माझ्या हातून योग्य सेवा घेतोस पण माझ्याबरोबर काही बोलत नाहीस (ह्याला म्हणावें तरी काय?).
🌹🌹🌹🌹🌹🌹
⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳
💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐
🚩🚩🚩🚩

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...