देगबुद्धी सांडी कल्पना दंडी ।

_*🚩देहबुद्धी सांडी कल्पना दंडी🚩*_
_*देहबुद्धी सांडी कल्पना दंडी ।*_
_*वासनेची शेंडी वाढवु नको ॥*_
_*तुते तुचि पाही, तुते तुति पाही ।*_
_*पाहुनिया राही जेथीच्या तेथे ॥*_
_*तुते तुचि पाही जेथे देहि नाही ।*_
_*मीपणे का वाया गुंतलासी ॥*_
_*एका जनार्दनी मीपण तूपण ।*_
_*नाही नाही मज आण ॥*_
_*👉🏻👉🏻👉🏻संत एकनाथ👏🏻*_ 
_*👉🏻संत एकनाथ जनलोकांना उपदेशपर बोध सांगताहेत. या अभंगात ते म्हणतात,  "आपली देहबुद्धी सोडून द्यावी. वासनेची व्याप्ती वाढू नये.  आपणच आपल्याला पाहावे. आणि ""शरीर म्हणजे मी नाही"" या वास्तवाचा बोध घ्यावा.  मीपणाच्या गुंत्यात व्यर्थ गुंतून राहणे हे काही योग्य नाही.  हे देवा, माझ्याकडे मी तू पणाचा भाव नाही हे मी तुझी शपथ घेऊन सांगतो."*_👏🏻👏🏻
_*👉🏻अध्यात्माच्या वाटेवर प्रवास करताना हळुहळु आपली आत्मिक प्रगती होत जाते.  माणूस विचार करू लागला की,  "मी कोण आहे" या प्रश्नाच्या टप्प्यावर तो येतो.  आपल्या परंपरेतील महावाक्य "कोsहं " म्हणजेच अस्तित्वाविषयी स्वतःला विचारलेला प्रश्न. चिंतनातून आणि विचारमंथनातून माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतात.  आणि प्रश्न निर्माण झाला की त्यांची उत्तरे शोधण्याच्या दिशेने संशोधन सुरू होते. आपल्या परंपरेतील तत्त्ववेत्यांनी  "कोsह"  या प्रश्नाचे उत्तर शोधले म्हणजे "सोsहं"  याचा अर्थ,  "तो तूच आहेस."*_ 🕉️🕉️
_*👉🏻"सोsहं" म्हणजे तो मीच असणे, आणि  "मी" तोच असणे. म्हणजे माझ्यातला "मी" चे आणि विश्वात्मक शक्तीचे अद्वैत असणे.  दोहोंचे एकरूपत्व झाले की भक्त आणि देव हा भेद उरत नाही. उपास्य आणि उपासक एक होतात.  आपण देवरूप होते.*_ 🔱⚜️ 
_*👉🏻हे झाले की तात्विक पातळीवरील शाश्वत सत्य.  व्यवहारात मात्र याच्या उलट अनुभव येतो.  माणूस स्वतःचा उल्लेख  "मी" या अक्षराने करतो.  "मी" म्हणताना त्याच्या डोळ्यासमोर विशिष्ट नाव प्रदान केलेले शरीर असलेला भाव असतो. हा  "मी"चा प्रवास नागरिक माणसाची भौतिक प्रगती जसजशी होत जाते, तसतसा वाढत जातो.  "मी" ची पुढची विस्तारित रुपये म्हणजे मी, माझे, मला, माझ्यासाठी, माझ्याकडून, इत्यादी.  ही  "मी"ची बाराखडी वाढत जाते आणि माणूस या मीपणाच्या बाराखडीत पूर्णपणे अडकतो.  जन्माला येताना आपण विशिष्ट शरीर सोबत घेऊन आलो.  मात्र या शरीराला कालमानाची मर्यादा आहे. एक ना एक दिवस शरीर मृत्यूच्या आधीन होणार आहे, याची जाणीव  असूनही या जाणिवेचे प्रतिबिंब त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसत नाही.  आपल्याला जणू काही अमरत्व प्राप्त झाले आहे अशा अहंकाराच्या गुर्मित तो वावरत असतो.*_ 🕉️🚩 
_*👉🏻आपण म्हणजेच शरीर व शरीरच सारे काही आहे असे मानणे म्हणजे देहबुद्धी. माणसाने या देहबुद्धीचा त्याग करून भविष्यातील वास्तवाचा अंगीकार करावा, असे संत एकनाथ म्हणतात.  आपण आपल्याशी संवाद करावा, आपल्या अंतरंगाचा शोध घ्यावा, असे त्यांचे सांगणे आहे.  "तुते तुचि पाही, तुते तुचि पाही" या अोळीतून हाच  अाशय व्यक्त झाला आहे.*_ 🚩🚩 
_*👉🏻संत आपल्याला आपल्या कल्याणाचा वा सार्थकतेचा मार्ग दाखवत असतात. सजग होऊन, लौकिक विचारांचे आवरण बाजूला करून संत विचारांचा मार्ग अनुसरला तर आपल्यालाही त्यांना गवसलेले सत्य उमगेल यात जराही संदेह नाही.  फक्त डोळसपणे आणि जागृतपणे फक्त विचार करून त्या वाटेने जाण्याची गरज आहे.*_ 🕉️🚩 
_*👉🏻अर्थात कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण संतांचे सांगणे विचारात घेऊन त्याची प्रचिती घ्यायला काय हरकत आहे ?.🚩🚩*_
_*👉🏻👉🏻👉🏻अमोल डोके👈🏻👈🏻👈🏻*_
_*🕉️🔱⚜️🌺🚩👏🏻जय जय राम कृष्ण हरि.पांडुरंग हरि.वासुदेव हरि🕉️🔱⚜️🌺🚩👏🏻*_
🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️🔱⚜️

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...