भोग द्यावे देवा ।

भोग द्यावे देवा।
 त्याग भोगींच बरवा।।१।।
आपण व्हावें एकीकडे।
  देव कळेवरी जोडे।।२।।
योजे यथाकाळें।
  उत्तम पाला कंद मुळें।।३।।
वंचकासी दोष।
   तुका म्हणे मिथ्या सोस।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
   ----->>>> भोगण्याचे वेळीं ते कृष्णार्पण करून भोगले तर त्या योगानें भोगाचा त्याग घडतो.
     ह्या भोगांचा सर्व भोक्ता देव आहे असें निश्चयानें जाणून आपण निराळें व्हावें म्हणजे देवाची ह्या देहांतच प्राप्ति होते.
     भुकेच्या वेळीं (ऋतुमानाप्रमाणें होणाऱ्या) कंद-मुळें-पाल्याची योजना (देवाला समर्पण करून)खाण्याकडे करावीं हें उत्तम.
     तुकाराम महाराज म्हणतात,(देवाला समर्पण न करतां भोग भोगणाऱ्या)आत्मवंचकास दोष लागतात,म्हणून ह्याबद्दल सोस धरणें (देवाला समर्पण न करण्याचा आग्रह धरणें)व्यर्थ आहे.

   🌹🌹🌹🌹🌹🌹
 
   ⛳⛳🙏🏻राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳

 💐💐🙏🏻 पांडुरंग हरि🙏🏻💐💐🌷🌷
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
केली सीताशुद्धी ॥
मूळ रामायणाआधी ||१||
ऐसा प्रतापी गहन ॥
सकळ भक्तांचे भूषण ||२||
जाऊनी पाताळा ॥
केली देवीची अवकळा ||३||
राम लक्षुमण ॥
नेले आणिले चोरून ||४||
जोडोनिया कर ॥
उभा सन्मुख समोर ||५||
तुका म्हणे जपे ॥
वायुसूता जाती पापे||६||
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
----->>>ज्याने मुख्य रामायण घडण्याअगोदरच सीताशुद्धी केली.असा जो अत्यंत प्रतापी असून सर्व भक्तांचे जो भूषण आहे. त्याने पाताळलोकात जाऊन पाताळदेवीची अवकळा केली.तसेच अहिरावणाने जे राम लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले होते, त्या अहिरावणाचा वध करून राम लक्ष्मणाला सोडवून आणले. जो श्रीरामासमोर नेहमी हात जोडून दास्यभावाने उभा असतो.म्हणुन जगद्गुरु  तुकोबा म्हणतात, त्या वायूपुत्र हनुमानाचे नामस्मरण करताच पापे नाहीशी होतात. 
🌷🌷राम कृष्ण हरि 🌷🌷
 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...