काळे साधियेला काऴ ।
मन करूनि निश्चऴ ।
लौकिकीं विटाऴ ।
धरूनि असो एकांत ।।४।।
कार्यकारणाची चाली ।
वाचा वाच्यत्वें नेमिली ।
एका नेमें केली ।
स्वरूपींच ओऴखी ।।५।।
नव्हे वेषधारी ।
तुका आहाच वरि वरि ।
आहे तैसी बरीं ।
खंडें निवडी वेदांचीं ।।६।।
---->>> वर्तमानकाऴात मनाला आत्मनिष्ठ करून पुढे येणाऱ्या काऴात देखील मन आत्मनिष्ठच राहील असे साध्य साधले आहे; आणि भोगलंपट लोकांचा विटाऴ मानून त्यांचा विटाऴ न होण्याकरिता एकान्तात राहू.।।४।।
माझी वाणी काही आवश्यक कामाच्या निमित्तानेच बोलत असते. येर्हवी, ही वाणी वाच्य असलेल्या हरीच्या नामाचे ठिकाणीच नियंत्रित केली आहे. मला आता आजवरच्या स्वधर्माचरणाच्या नियमाने आणि हरिचिंतनाच्या नियमाने आत्मस्वरूपाची ओऴख झाली आहे.।।५।।
श्री.तुकाराममहाराज म्हणतात, मी वर वर दांभिकपणाने वेष धारण करणारा संन्यासी नाही, तर खराच क्षेत्र संन्यासी आहे. आता या संन्यासधर्माच्या नियमानुसार वेदाची जी ईशावास्यादी खंडे आहेत, त्यांचा तात्पर्यरूपाने विचार करीत आहे. उपनिषदातील अद्वैतसिद्धान्ताचे श्रवण, मनन, निदिध्यासन करीत आहे.।।६।।
*॥ रामकृष्णहरि ॥* 🚩🙏🏻
अनुहात ध्वनि वाहे सकळा पिंडी |
राम नाही तोंडी कैसा तरे ||1||
सकळां जीवामाजी देव आहे खरा |
देखिल्या दुसरा विण न तरे ||2||
ज्ञान सकळा माजी आहे हे साच |
भक्तिविण तेच ब्रम्ह नव्हे ||3||
काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां |
दीप न लागतां उन्मनीचा ||4||
तुका म्हणे नका पिंडाचे पाळण |
स्थापू नारायण आतुडेना ||5||
---->>
योग्याभ्यासाने सर्व ह्यदयात अनाहत ध्वनी एकसारखा होत असला तरी रामनाम तोंडात नसेल तर तो कसा तरून जाईल ?||1||
सर्व जीवांमध्ये देवाची व्याप्ती आहे ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा आपल्याशी तो अभिन्न आहे असे ज्ञान झाल्याशिवाय कोणीही कसा तरेल ? अर्थात अभेदाने साक्षात्कार झाल्यावाचून तरावयाचा नाही •||2||
सर्व लोकांत ज्ञान आहे हे खरे परंतु सगुण भक्ति वाचून ते ज्ञान ब्रम्हज्ञान होत नाही कदाचित ब्रम्हज्ञान झाले तरी ते ब्रम्हज्ञान ब्रम्हस्वरूप होत नाही वृत्तीरूपाने राहाते •||3||
खेचरी भुचरी इत्यादी मुद्रा स्वत:ला कळल्या ; आणि कशा कराव्यात हेही लोकांना सांगता आले तरीपण उन्मनीची दीप ह्यदयात उजळल्या शिवाय तो कसा तरेल ? ||4||
तुकाराम महाराज म्हणतात देहाचे पोषण ज्यात आहे अशा चार्वकमताची स्थापना करू नका कारण त्यामुळे नारायणाची प्राप्ती होणार नाही •||5||
🌺विठ्ठल 🌺विठ्ठल 🌺विठ्ठल 🌺
No comments:
Post a Comment