रुपी जडले लोचन ।



रूपी जडले लोचन! 
पायी स्थिरावले मन!!

देहभाव हरपला! 
तुज पाहता विठ्ठला!! 

कळो नये सुख दुःख! 
तहान हरपली भुक!! 

तुका म्हणे नव्हे परती! 
तुझ्या दर्शने मागुती!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय* 
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
जगद्गुरू तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे!

 या अभंगात तुकोबाराय म्हणतात ,

रूपी जडले लोचन! 
पायी स्थिरावले मन!!

*देवा तुझे रूप मला भारावून टाकले आहे..... तुझ्या नामाचा छंद मला लागले आहे . तुझ्या भक्तीत रंगून गेल्यावर मला देहिच विदेही होऊ दशा अशी अवस्था झाली आहे. या डोळ्यासमोर सतत भगवंताचे रूप पहावे  आणि मन मात्र त्यांच्या पायी स्थिरावले आहे . माऊलीने सुध्दा म्हंटले आहे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा असे हे पावन रूप आहे देवा तुझे किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे प्राण  करा देवाशीच अर्पण....... या डोळ्यात तुझे रूप साठवून ठेवले आहे. साठविला हरी जिही हदय मंदिरी त्याची सरली येरझार झाला सुफल संसार*... तुझे रूप माझे  मनी राहो नाम जपो वानी वारे पांडूरंगा तुच श्रीरंगा आहे तुझ्या भक्तीचा महिमा अगाध आहे!!

 म्हणून अभंगाचे दुसर्‍या चरणात तुकोबाराय म्हणतात ,

देहभाव हरपला !
तुज पाहता विठ्ठला !!

*विठ्ठल आवडी  प्रेम भाव तुझ्या नामाचा हो टाहो....... समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो... त्याचे चरण सुन्दर आहे. विषयी विसर पडला निषेद अंगी ब्रम्ह रस ठसावला....... माझी हरी वृत्ती भगवंता पाशी एकरूप होऊन  गेलो तेंव्हा मात्र खरोखरच कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही असे वाटले !! कारण विठूराया च्या रूपात सर्व लावण्य दडलेले आहे...... वि म्हणजे विश्व ठ म्हणजे ठासून भरलेला आणि ल म्हणजे लक्षदिप...... या विश्वाचे कल्याण करण्यासाठी भगवान परमात्मा विठ्ठल सदैव तत्पर आहे . तो देवाचाही देव आहे..... विठेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शुरदाता..... तो कृपाळू आहे त्यांच्या भक्तीत रंगून गेल्यावर माझे  देहभान विसरून जातो . विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही*. असा  हा भक्तीचा महामेरू विठ्ठल जीवभाव भक्तांना अर्पण करतो म्हणून तुझ्या भक्ती मध्ये तल्लीन होऊन गेल्यावर आपोआप माझे देहभान हरपून जाते!!

 म्हणून अभंगाचे तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात ,

कळो नये सुख दुःख !
तहान हरपली भूक!!

*देवा मला खरोखरच  अप्रतिम चिंतन आहे....... तुझ्या नानाविध रूपाने आम्हाला आत्मसुख प्राप्त झाले आहे . तुझ्या नामाचा छंद मला लागले कि तु माझे सर्व मनोरथ पुर्ण करतो ......अंतरीची घेतो उढी बाहेर धाकोटी मुर्ती उभा..... भगवंत हा भावाचा भुकेला आहे. देवाला फक्त एकनिष्ठ भावनेतून सेवा करावी लागते.....भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद....... जळी स्थळी पाषाणी मला तुच दिसतो. चैतन्य स्वरूप भगवान परमात्मा पंढरीश पाडूरंग जगजेठी विठ्ठल त्यांची भक्तीची ओढ मनाला लागली कि मला कशाची चिंता व्यक्त करायची गरज नाही. तहान भुक हरपून जाते नव्हे नव्हे तर  आमच्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही!! कधीच आपल्याला दुखासी सामना करायची गरज नाही ऐवढी बेभान होऊन भगवंताचे नामस्मरण करावेत यातच आपले हित आहे! या सुखाकारणे  देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला....... नामस्मरणाने सर्व काही साध्य होते म्हणोनी शरण जावे सर्व भावे देवाशीच भजावे देवा माझे मन लागो तुझे पायी. तुझे नामस्मरण घेतल्याने काय होते ? तर तेणे तुटती बंधने....... सर्व बंधने तुटून पडतात आणि आपली किर्ती अजरामर राहतेच सुख दुःखाचे निवारण करणाऱ्या वैकुंठवासीनी विठाबाई तुझ्या भक्तीचा महिमा गात आहे तुझ्या भक्तीत तल्लीन होऊन जातोय!!*

 म्हणून अभंगाचे शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात ,

तुका म्हणे नव्हे परती !
तुझे दर्शन मागुती !!

*दर्शन दे रे दे रे भगवंता...... तुझ्या भक्तीविणा मला समाधान प्राप्त होत नाही. म्हणून मी तुझ्या भक्तीचा महिमा गात आहे. तुझ्या नामाचा हो टाहो माझी आई विठाबाई मी तुझे दर्शन मागतो. मागत्याची  पुरे देवा मी उमगलो नाही कोठे गुंतलाशी द्वारके च्या राया....... वेळ का सख्या लावियले... तु अनंत रूपे धारण करून या जडजीवाचा उद्धार करतो म्हणून त्यांला एकनिष्ठ भावनेतून सेवा करावी लागते....... भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद.......  मला  आता तुझ्या शिवाय कोणी नाही तुच करता करविता भगवान परमात्मा विठ्ठल आहे . त्यांची मनोभावे पूजा अर्चना भजन कीर्तन जागरण आराधना उपासना तनमन एकाग्र चित्ताने करावे !! कर्म धर्म त्याचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता....... मला समाधान तुझे दर्शन घेतल्यानंतर  मिळेल म्हणून मी तुला शरण आलो आहे मला तु सतत दर्शन द्यावे! मी दर्शन घेतल्या शिवाय जाणार नाही. याज साठी केला होता अट्टाहास*.. कारण हा सोहळा अलौकिक  आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात!
⛳🐚⛳🐚⛳🐚⛳🐚⛳🐚⛳
🌸 🌹
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...