आमुच्या बापाचे ठेवणे ।

*आमुच्या बापाचे ठेवणे*     
 *आमुच्या बापाचे ठेवणे ।  
  कान तु देसी आम्हा कारणे ॥ 
  कैसी तुझी नीत बरी । 
  मागता शिणलो मी हरी ॥
  वाडग्या येरझरा ।
  किती कराव्या दातारा ॥ 
  कर्ममेळा म्हणे हरी । 
 किती मागावे निर्धारी ॥    
         >------>     संत कर्ममेळा   
     >---->    संत कर्ममेळा हे संत चोखामेळा यांचे पुत्र. चोखामेळा यांच्याप्रमाणे त्यांनी अभंगरचना केली आहे. संत चोखामेळा हे त्यांचे अध्यात्मिक गुरू. 
     >----->      या अभंगात संत कर्ममेळा यांनी विठ्ठलाशी संवाफ केला आहे. ते म्हणतात,  हे विठ्ठला तुझ्या चरणी भक्तीचा अधिकार ही माझ्या वडिलांकडुन मला मिळालेली ठेव आहे. हे देणे तू आम्हाला का नाकारतो आहेस ? ही तुझी रीत काही बरी नव्हे. मी तुझ्या दारी किती निरर्थक येरझ-या माराव्यात हे तुच सांग. हे हरी, मी दृढ निश्चयपुर्वक ठामपणे तुझ्या भक्तीचा अधिकार मागतो आहे. मी हे मागणे कुठवर मागावे ?    
      >----->   संत कर्ममेळा यांना वंशपरंपरेने विठ्ठलभक्तीचा वारसा लाभला होता. समाजाचा सर्व थरातून संतांची मांदियाळुि निर्माण झाली. या सर्व संतांच्या परिवारातील कुटुंबही आकंठ भक्तीरसात बुडाले होते.  
     >----->   भक्तीचा हा कस अस्सल होता. अंतरीच्या गाभ्यापासुन आला होता. वरवरच्या देखाव्याला न भुलता अंतरंगातील भक्तीचे तत्व आणि सत्व महत्वाचे असते. ही चोखामेळा यांचीच शिकवण होती. अपल्या एका प्रसिध्द अभंगात हे तत्व सांगताना त्यांनी म्हटले अाहे,     
       ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ।     
       काय भुललासी वरलिया रंगा ॥   
      चोखा डोंगा परि भाव  नोहे डोंगा ।   
      काय भुललासी वरलिया रंगा ॥                 
   वरवरच्या बाह्य वेशाला न भुलता आतले रामभक्तीचे तत्व महत्वाचे आहे, हे सांगताना कबीर आपल्या एका रचनेत म्हणतात,      
       माला तिलक तो भेष है,  
       राम भक्ती कछु आैर    
      कहै कबीर जिन पहिरिया,    
      पांचो राखे डौर                      
   (गळ्यात माळा, कपाळावर टिळा हे बाह्य उपचार आहेत. या बाह्य रुपाला न भुलता अंतरीचे रामतत्व ओळखणे महत्त्वाचे आहे. बाह्य रुपरंग हा एक देखावा आहे. त्यात न अडकता अंतरीचा राम उमगणे हेच खरे इप्सित आहे.  हेच शाश्वत सत्य आहे. ज्याने राम ओळखला तो पाचही इंद्रियांना ताब्यात ठेवतो आणि माया, मोह आदींपासुन मुक्त होतो. )   
   >----->        देवाशी संवाद करणाची, प्रसंगी त्याला जाब विचारण्याची ताकद येते ती भक्तीच्या शक्तीतून. जातीपातीमुळे होणार्‍या सामाजिक अन्यायाची धारही कर्ममेळा यांच्या रचनेत अनेक ठिकाणी प्रकट झालेली दिसते.  
    "हीनत्व आम्हसी हीनत्व  आम्हासी ।
    हीनत्व आम्हासी देवराया ॥"      या शब्दांमधली वेदना काळजाला घरे पाडते.  कर्ममेळा यांचा हा प्रश्न जसा विठुरायाला आहे तसाच तो समाजपुरूषालाही आहे.    
    >------>          हा सारा दु:खाचा काळोख पचवून संतांनी विठ्ठलाच्या पायी विसावा शोधला.  विठ्ठल भक्तीचा वारसाहक्क हा कर्ममेळा यांच्या अभिमानाचा विषय आहे. भक्तीचा हा अनुबंध विठ्ठलाबरोबर केलेल्या संवादातुन नेमकेपणाने प्रकट झाला आहे.       
    >------>              

*तुकास्र - 30*
🙏 *संत तुकारामांचे सुविचार*🙏

*बाप करी जोडी, लेकराचे ओढी ।*
*आपुली करवंडी वाळवूनी ।।*
*एकाएकी केलों मिरसीचा धनी ।*
*कडिये वागवूनी भार खांदी ।।*

*अर्थ-*
*"भविष्यात मुलाचं कल्याण व्हावं, या अपेक्षेपोटी वडील पैसा कमवत राहतात. यासाठी ते पोट पाठीला लागेपर्यंत कष्ट करतात. आयुष्यभर कमावलेलं सगळं ते मुलाला आयतं आणि एकदम देऊन टाकतात. मूल खूप लहान असताना त्याला कडेवर वागवतात, तर थोडं मोठं झाल्यावर त्याचं ओझं खांद्यावर वाहतात."*

*चिंतन-*
*वडील करीत असलेले काबाडकष्ट मुलाला सहज दिसणार नाहीत. या अभंगात तुकोबा नेमकं या विषयावर भर देतात. आपल्यासाठी वडील करीत असलेल्या कष्टाची जाणीव होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.*

*'मी पाहिलेले दिवस माझ्या मुलाला पाहायला मिळू नये', 'मी भोगलेलं दुःख मुलांच्या वाट्याला येऊ नये', असंच प्रत्येक वडिलांना वाटतं. म्हणूनतर शाळेची फीस जास्त वाटत असली, तरी आपापल्या ऐपतीनुसार वडील मुलाला मोठ्या शाळेत टाकण्याचाच प्रयत्न करताना दिसतात.*

*'खूप कष्ट केले' म्हणत, 'आता स्वतःसाठी जगू' म्हणणाऱ्या वडिलांना मुलं मोठी झाली, की आधीचं घराचं कर्ज फिटत येत नाही तोपर्यंत, शिक्षणासाठी  दुसरं कर्ज काढून उतरत्या वयात परत हप्ते फेडण्याची वेळ येते. हे मुलांना सहज दिसत नाही. 'आता स्वतःसाठी चार चाकी गाडी घेऊ' म्हणणाऱ्या वडिलांना कॉलेजला जाणाऱ्या मुलाला हप्त्यानं दोन चाकी गाडी घेऊन देण्याची वेळ आल्यावर, बापाचं स्वतःच्या गाडीचं स्वप्न भंगलेलं मुलाला सहज दिसत नाही.*

*तुकोबाराय मुलांना हेच सांगत आहेत, की 'तुम्ही लहान असताना त्यांनी तुम्हाला कडेवर घेतलं. अक्षरशः खांद्यावर घेऊन 'तुमचं ओझं वाहायलं.' याची तुम्ही मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे. तुमच्यासाठी घर, गाडी, पैसा कामावताना उपासमार त्यांनी सहन केली. वेळेवर जेवणाचं भान नाही ठेवलं. कधी-कधी तर एवढे काबाडकष्ट केले, की त्यांचं पोट पाठीला टेकलं.'*

*मुलांसाठी जगणाऱ्या वडिलांना, ज्यावेळी मुलं मोठी होतात आणि वडिलांनाच उलटून बोलतात, 'आमच्यासाठी तुम्ही काही नाही केलं, आणि जे केलं ते तुमचं कर्तव्यच होतं' असं म्हणतात, त्यावेळी त्या वडिलांना किती पश्चात्ताप होत असेल? हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे. ज्या घरात ते राहत आहेत, ते वडिलांनी तुमच्याच साठी कमावलेलं असत*.

*'मुलांनी मला मान दिला पाहिजे', असा हट्ट वडील कधीच करत नाहीत. पण 'निदान अपमान तरी करू नये', येवढी माफक अपेक्षा करण्याचा अधिकार तर त्यांना नक्कीच आहे. कर्तव्य म्हणून का होईना!*

*त्यांच्या जिवंतपणी त्यांच्याकडं पाहून हसा 😊, ते मेल्यावर लोकांसमोर रडून 😥 काय उपयोग?*

   🙏🙏💐💐🙏🙏   

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...