लागला टकळा पंढरीचा


🌺 || लागला टकळा पंढरीचा||🌺

#ज्ञानोबा_तुकाराम....
ज्ञानोबा तुकाराम....
ज्ञानोबा तुकाराम....

     "ज्ञानोबा-तुकाराम" हा नाम गजर म्हणजे महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक महामंत्र आहे. 
   माऊली ज्ञानोबाराय हा महाराष्ट्राचा #श्वास आहे, तर जगद्गुरू तुकोबाराय हा #निःश्वास आहे. ज्ञानोबा-तुकाराम या महामंत्रातच सर्व साधुसंतांचा आणि संतपरंपरेचा समावेश होतो.
      आचार्य अत्रे म्हणतात ‘‘मराठी भाषेतून आणि मराठी जीवनातून ‘ज्ञानोबा-तुकोबा’ वजा केले, तर बाकी काय राहील?’’
      सद्विचारांचे आणि सद्भावनेचे केवढे गडगंज धन त्यांनी महाराष्ट्रावर उधळून ठेवले आहे.  माऊली ज्ञानोबाराय या मार्गावर रंगले आणि नाचत गात सांगू लागले.

#अवघाचि_संसार_सुखाचा_करीन ।
#आनंदे_भरीन_तिन्ही_लोक ।।
#जाईन_गे_माये_तया_पंढरपुरा ।
#भेटेन_माहेरा_आपुलिया ।।

    तर तुकोबाराय या मार्गावरून चालताना अवघे विठ्ठलरूप होऊन म्हणू लागतात.

#विठ्ठल_टाळ_विठ्ठल_दिंडी ।
#विठ्ठल_तोंडी_उच्चारा ।।
#विठ्ठल_अवघ्या_भांडवल ।
#विठ्ठल_बोला_विठ्ठल ।।

    ज्ञानभक्तीच्या समचरणावर अठ्ठावीस युगे परब्रह्मरूपात श्री पांडुरंग परमात्मा उभा आहे. त्यांना भक्तिप्रेमाने भेटायला निघालेला वैष्णवांचा मेळा जेव्हा वारीच्या रूपात उभा राहतो, तेव्हा भक्तीचे व्यापक भावदर्शन अनुभवता येते. 
    वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका खांद्यावर फडकली, ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली, भक्तीच्या पेठेत अद्वैतभावाची देवाण-घेवाण झाली. सदाचाराचा व्यापार फुलला, अवघाचि संसार सुखाचा झाला आणि पंढरीच्या वाळवंटात #एकची_टाळी_झाली. ती अद्वैताची ‘एकची टाळी’ हेच वारकऱ्यांचे लक्ष्यही ठरले आणि लक्षणही. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचे रिंगण फुलते. लौकिक लोकजीवनाला अलौकिकाचा स्पर्श होतो आणि पारलौकिकाची अनुभूती मिळते.
    अनुभवामृताच्या प्रेमसागरात विहरण्याचा हा आनंद माऊलीं ज्ञानोबारायांनी स्वत: घेतला आणि इतरांनी तो कसा घ्यावा हे वारीच्या रूपाने शिकवले. प्रेमच प्रेमाची अनुभूती घेऊ शकत नाही; पण इथे प्रेमानुभवच भक्तिप्रेमाच्या सहवासाने सुखावतो आणि प्रेमच प्रेमाला साठवित चालू लागते. या प्रेमाची पताका खांद्यावर मिरवित माऊली ज्ञानोबाराय नाचत नाचत म्हणू लागतात......

#माझे_जीवीची_आवडी । 
#पंढरपुरा_नेईन_गुढी ।
#पांडुरंगी_मन_रंगले । 
#गोविंदाचे_गुणी_वेधिले ।।

  आपन पन या प्रेमाची पताका खांद्यावर मिरवित माऊली ज्ञानोबाराय-तुकोबारायां सोबत नाचत नाचत पंढरीला जाऊया.
#येताय_न_मग_वारीला 

|| लागला टकळा पंढरीचा ||
..........चला तर मग....पंढरीला..!!!

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...