आत्माराम



* आत्माराम *
"अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः"
भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवत् गीतेत ग्वाही देतात, यच्चयावत प्राणीमात्र, सकळ जीवजंतु व
भुतसंभुतीचे ठाई, ह्दयस्थ असलेल्या परमात्म्याचे आत्मरुपाने अस्तित्व व वास असतोच.
प्रत्येक जीवाचे अंतःकरणात नांदणारे आत्मतत्व
हेच सनातन शिवरुप परिपुर्ण ब्रम्ह होय. ह्दयातील भगवंत किंवा आत्माराम तो हांच.
ह्दयी परमात्मा नांदे परिपुर्ण !
तो शिव सनातन पुर्ण ब्रम्ह !! ए.म.

माउली ज्ञानोबाराय म्हणतात,
सकळ भुतमात्रांचे अंतरात म्हणजेच ह्दयस्थ महा आकाशात चैतन्यरुप असा ब्रम्हभास्कर स्वतःच्या सहस्त्र किरणांनी उदयाला येऊन स्थिरावतो, तोच सद्चिद् घन आत्माराम म्हणवतो.
सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं ।चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो ॥

ज्याप्रमाणे एखादा कस्तुरी मृग हा सुगंध सौरभाचे नादांत वनांत चहुकडे धावांधाव करतो. पण तीच सुगंधी कस्तुरी स्वतःचेच नाभीत असुन देखील त्याविषयी अनभिज्ञ व अजाण असतो.
नाभी मृगाचे कस्तुरी !
व्यर्थ हिंडे वनांतरी !!
त्याचप्रमाणे आम्ही मुढ अज्ञजीव नाना साधनांच्या खटपटा करुन स्वतःला मायाजाळी गुंतवुन घेतो. आणी त्या हरिणांप्रमाणे ह्दयस्थ आत्मारामाला न ओळखता तीर्थांत व इतरत्र शोधतो.
ह्दयस्थ आत्माराम नेणती !
मुर्ख ते फिरती तीर्थाटणी !!

संत कबिरदासजी सुद्धा हेच सांगताहेत,
साहिब तेरी साहिबी, सब घट रही समाय ।
ज्यों मेहँदी के पात में, लाली लखी न जाय ॥
ज्याप्रमाणे मेहंदीच्या पानांत प्रत्यक्षात लाल रंग दिसत नसला तरि ती लालिंमा त्यांमधे असतेच. तद्वतच सकळ सचेतन जीवांचे ठायी चैतन्य रुपानं भगवंत सामावलेला असुन तो आत्मरुपाने वास करतो. संदेह निवृत्त साधुसंतांचे ठाई हा स्वस्वयमेव आत्माराम अनुभुतीतुन प्रगट होतो.
देही आत्मा परिपुर्ण !
भरला संपुर्ण चौदेही !!

नाशिवंत व अशाश्वत अश्या पंचतत्विय शरीरातील
अजर, अमर अविनाशी व नित्य शाश्वत असलेलं हे आत्मतत्व केवल परब्रम्हच होय.
आत्मा तो देही नाशिवंत नाही !
अशाश्वत पाही कलेवर !!

देहरुपी देवालयात, ह्दयीचे सिंहासनावर विराजीत सार्वभौम सत्ताधिपती, विश्वात्मक परमात्म्याचेच शाश्वत रुप असलेला आत्माराम हा भक्तांचे जवळ असुनही जीव अज्ञानवश संशयात्मक बुद्धीने ग्रस्त होऊन त्याचा इतरत्र शोध घेत रानीवनी हिंडतो, याचेच साधुसंतांना महदाश्चर्य वाटते.

देहिचे देवळी आत्माराम नांदे !
भांबावला भक्त हिंडे सदा राने !!

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...