जाणोनी नेणते माझे कर ।

*🚩जाणोनी नेणते करि माझे मन🚩*    
*जाणोनि नेणते करि माझे मन ।*  
*तुझी प्रेमखुण देऊनिया ॥*  
*मग मी व्यवहारी असेन वर्तत ।*
*जेवी जळआत पद्मपत्र ॥* 
*ऐकोनि नाईके निंदास्तुती कानी ।*  
*देखोनि न देखे प्रपंच हा दृष्टी ।*  
*स्वप्नाचिया सृष्टी चेविल्या जेवी ॥*  
*तुका म्हणे ऐसे जालियावाचुन ।*  
*करणे ते ते वाटतसे ॥*     
     *👉🏻👉🏻👉🏻 संत तुकाराम.*         
  *🚩👉🏻👉🏻 या अभंगात संत तुकाराम म्हणतात,  "हे देवा, तुमच्या प्रेमाची खूण देऊन माझे मन जाणते वा ज्ञानी असूनही ते नेणते करा. मग पाण्यामध्ये कमळ असूनही ते पान कोरडे राहते तसा संसारात राहूनही मी अलिप्त राहीन. जसा स्वप्नात अनेक सृष्टीचा भास होतो व जागृत झाल्यावर तो मिथ्या आहे, असे कळते. तसा प्रपंच दिसत असूनही   तो खोटा आहे हे ओळखून मी आंधळ्यासारखा राहीन. अशी स्थिती झाल्याशिवाय जे काही करावे ते व्यर्थ वाटते. मनाला येतो."* 
  *🚩👉🏻👉🏻 माणूस आपल्या दैनंदिन व्यवहारिक आयुष्यात गर्क असतो. या व्यवहारातील माणसाच्या कर्तृत्वाचे विविध पदर उमलत जातात. माणसाची वागण्यात, बोलण्यात याची जाणीव होते. "मी केले", "माझ्यामुळे झाले" या मी तत्त्वाच्या भावनेला संत तुकोबाराय जाणीव असे म्हणतात. ही जाणीव म्हणजेच माणसाची व्यवहारातील अस्तित्व होय. जाणिवेच्या गर्भात अहंकाराचा स्पर्श दडलेला असतो. जाणिवेमुळे कुठला परिणाम होतो ? तर आपण परमेश्वरापासून दुर जातो. म्हणून कर्माच्या कर्तृत्वाची जाणीव नष्ट करावी असे ते देवाला विनवितात. यांमुळे आपण व्यवहारात गर्क असलो तरी पाण्यातील कमळाप्रमाणे असावे अशी त्यांची धारणा आहे.  ज्या हालचाली जाणीवेने होतात त्या अापोआप वा आपल्या गतीने व्हाव्यात अशी अवस्था येते,  ती "नेणीव"होय.  "मी केले" ही जाणीच आणि "माझ्याकडून हे करविले गेले" ही नेणीव. म्हणजे आपण काय करीत आहोत, याची जाणीव कल्पना नसते ही "नेणीव" होय. मन हे नेणिवेच्या स्वरूपात गेले, की ते आपोआप शून्य अवस्थेत पोचते.*   
  *👉🏻👉🏻👉🏻 नेणीवेचे अवस्था सांगण्याकरता संत तुकारामांनी तीन उदाहरणे दिली आहेत.  कमळाचे पान, उन्मन अवस्थेतील योगी आणि विरत जाणारी स्वप्नसृष्टी. कमळ ज्याप्रमाणे पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त राहते तसे आपण राहावे असे त्यांना वाटते. व्यवहारात राहूनही त्यापासून अलिप्त राहिलो की आपण विठ्ठलाच्या अधिक जवळ जाऊ असे त्यांना वाटते. उन्मनी अवस्थेतला योगी लोकांमध्ये राहतो, पण लोकांच्या वागण्याबोलण्याचा त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही. तशी स्तुती वा निंदा अशा दोन्हींबाबत समान स्थिती व्हावी असे ते म्हणतात. रात्रीच्या स्वप्नातील दृष्टी सकाळी नाहीशी होते, तसाच प्रपंच करावा पण तो विसरून जावा असे ते म्हणतात.*        
>--->  *म्हणजेच प्रपंचाचे व्यवहार नेणिवेच्या पातळीवर करणे. म्हणून  "तुझी प्रेमखुण देऊन नेणिवेच्या अवस्थेला ने" अशी ते विठ्ठलाला विनवणी करतात. यामुळे विठ्ठलाचा संग नित्य लाभेल. अन्यथा मनाला शीण होईल अशी त्यांची धारणा आहे. व्यवहारातील सुखदुःखे नेणिवेच्या पातळीवर म्हणजे अलिप्तपणाने अनुभवता यावी आणि मन सतत विठ्ठल चरणी लीन व्हावे अशी विनवणी संत तुकारामांनी विठ्ठलालाच केली आहे. जाणीव ते नेणिव प्रगल्भतेचा प्रवास आहे. हे साध्य झाले, की संसारातील दोष न चिकटता आपल्याला देवाची प्राप्ती होते.*                        *🙏🏻🕉🔱🚩💐🙏🏻🕉🔱💐🚩   👉🏻👉🏻 अमोल डोके🌹🌹 🙏🏻🕉🔱🚩💐*     *🕉🔱🚩🙏🏻 जय जय राम कृष्ण हरि, पांडुरंग हरि 🕉🔱🚩🙏🏻*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...