🚩 *श्री रामनवमी* 🚩
*उत्तम हा चैत्रमास|*
*ऋतु वसंताचा दिवस ||१||*
*शुक्लपक्षी ही नवमी |*
*उभे सुरवर व्योमी||२||*
*माध्यान्हासी दिनकर |*
*पळभरी होय स्थीर ||३||*
*धन्य मीच त्रिभुवनी|*
*माझे वंशी चक्रपाणी||४||*
*सुशोभित दाही दिशा|*
*आनंद नरनारी शेषा||५||*
*नाहि कौसल्येसी भान|*
*गर्भी आले नारायण ||६||*
*अयोनी संभव |*
*प्रकटला हा राघव ||७||*
*नामा म्हणे डोळा |*
*पाहीन भुवन त्रयपाळा ॥८॥*
*--->> चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात नवमीला वसंत ऋतूत दुपारी 12 वाजता सुर्य सुध्दा भ्रमण करताना क्षणभर स्थिर होऊन श्री राम प्रभूंना वंदन करतो.त्याचप्रमाणे दाही दिशाला सर्व सृष्टीवर आनंदी आनंद होतो.त्याच वेळी आयोनीसंभव होऊन माता कौशल्याच्या पोटी प्रभु रामचंद्र जन्माला येतात.सगळी कडे आनंदी आनंद होतो.गोरगरिबांना तसेच खरे रयतेचे राज्य म्हणजेच तेच *रामराज्य"त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद होतो.आयोधेत गुढी व तोरणे ऊभारतात व सर्व देव सुरवर पण त्याचा आनंद घेतात...........*
*आपणास व आपल्या परिवारास श्री रामजन्माच्या भक्तिमय शुभेच्छा* 💐💐
No comments:
Post a Comment