🚩 *या रे हरि दासांनो*🚩
या रे हरी दासानो जिंको कळिकाळा|
आमुचिया बळा पुढे किती बापुडे||१||
रंग सुरंग घमंडी नाना छंदे|
हास्य विनोदे नामाची आवडी ||२||
येणे तेणे प्रकारे बहुतां सुख जोडे|
पुजनते घडे नारायणा अंतरी||३||
वाकुडीया माना बोल बोलावे अरुष|
येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा||४||
आपुल्या आनंदे एकापुढे एक नट|
नाही थोर मोठा लहान या प्रसंगी||५||
तुका म्हणे येथे प्रेम भंगु नये कोणी|
देव भक्त दोन्ही निवडीता पातक||६||
_*:--->बाबांनो आपण आता कळीकाळाला जिंकू आमच्या सामर्थ्यापुढे तो बापुडा कितीसा आहे.शरीराला माळा-मुद्रीकांनी चांगले नटवा भक्तपणाची घमेंड असु द्या त्या योगे हरीनामाची आवड वाढवा.या सर्व प्रकाराने पुष्कळ सुख प्राप्त होते व अंत:करणात नारायणा विषयी प्रेम निर्माण होऊन त्याची सेवा घडते.वाकड्या माना करुन डौलाने व हर्षभराने गीत गावे चांगले संगीत येत नसेल तर वेडेवाकडे अबद्ध जसे होईल तसे हरीनाम घ्या ज्याला ज्या भक्तीचा छंद असेल ती भक्ती गोविंदाला आवडते.आपल्या आवडीप्रमाणे एकापेक्षा दुस-याने वरचड अधिकार संपन्न होऊन नटावे परमार्थामध्ये गरीब श्रीमंत उच्चवर्णीय नीचवर्णीय असा भेद नाही जो अधिकार संपन्न हेईल तो श्रेष्ठ होय.म्हणुन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या भक्तीक्षेत्रात कोणी केवढाही ज्ञानी असला तरी त्याने भक्ती प्रेमाचा उच्छेद करवा आणि कोणी केवढाही भक्त असला तरी देव आणि भक्त यांच्यात परमार्थात भेद पाहील तर त्यास पाप लागेल.*_
‼️ *राम कृष्ण हरि*‼️
No comments:
Post a Comment