महाभारत युद्धच्या वेळी जांबवत जे सप्त चिरंजीव मानले जातात ते होते आणि त्यांच्या मुलीशी भगवान श्रीकृष्ण यांचे लग्न झाले होते। जांबवतांनी श्रीकृष्ण साक्षात श्रीरामचाच अवतार आहे हे ज्ञात नसल्याने त्याचे 28 दिवस पर्यंत युद्ध झाले आणि मग त्यांना ओळखून आपल्या लाडक्या जांबवती चे लग्न श्रीकृष्ण यांचेशी लावून दिले होते.
पण जांबवन्त युद्धात कधीही भाग घेतला नाही.
त्याबद्दलची एक प्रसिद्ध ओवी आहे नाथांची
जववरी रे जववरी जनबुत करी गर्जना।
जवच्या पंचांनना देखिले नाही रे बाप।
अर्थात जांबवतांनी श्रीकृष्ण यांना ओळखले नव्हते, तोवरच तो गर्जना करून लढत होता मग सरळ त्याना शरण आला. जांबवती ही श्रीकृष्ण यांची पट्टराणी होती ज्यांची संख्या 8 होती.
तिचा पुत्र पण महारथी आणि शूर होता।
श्री बीभीषण देखील कुठे तरी असतीलच कारण तेपण चिरंजीव आहेत!
ही भक्त मंडळी जिथे कुठे राम कथा श्रवण कीर्तन होत असेल तिथे जाऊन ती श्रवण करतात असे म्हटले जाते.
हनुमानजी साठी तर श्रीराम कथा जिथे वाचली जाते, तिथे एक उत्तम आसन ठेवण्याची प्रथा आहे. असा विश्वास /श्रद्धा आहे की हनुमानजी ती ऐकायला येतात पण त्यांना आसन देण्याने ते पण प्रसन्न होतात.
माझी आजी (आई ची आई सदैव असे आसन मांडून मगच रामायण वाचत असे! हे आसन तर रिकामेच असते पण श्रद्धा आहे की ते तिथे बसतात।)
श्रीराम।
No comments:
Post a Comment