*🚩🕉️‼️श्री विठ्ठल ‼️🕉️🚩*
*जे गाती अखंड विठ्ठलाचें गीत।*
*त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी।।१।।*
*जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम।*
*ते माझे परम प्राणसखे।।२।।*
*जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं।*
*त्यांचे पायवणी स्वीकारीन।।३।।*
*विठ्ठलासी जींही दिला सर्व भाव।*
*त्यांच्या पायीं (जीव ठेवीन मी)ठाव मागईन।।४।।*
*तुका म्हणे रज होईन चरणींचा।*
*म्हणविती त्यांच्या हरिचे दास।।५।।*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*भावार्थ:-विठ्ठलगुणांचें जे अखंड गायन करितात,त्यांचे पायीं मी आपलें चित्त ठेवीन.*
*ज्यांस विठोबाचें नाम प्रिय आहे,ते माझे परम प्राणसखे आहेत.*
*ज्यांच्या डोळ्यांस विठ्ठलाचें दर्शन प्रिय आहे त्यांचें चरणतीर्थ मी घेईन.*
*ज्यांनीं आपलीं काया-वाचा-मन विठ्ठलास अर्पण केलीं आहेत, त्यांच्या चरणीं मी आपला ठाव (आश्रय)मागेन.*
*तुकाराम महाराज म्हणतात,जे कोणी आम्ही हरीचे दास आहों असें म्हणवितात,त्यांच्या चरणांचा मी रज:करण होईन.*
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
*⛳⛳🙏🏻 राम कृष्ण हरि 🙏🏻⛳⛳*
*💐💐🙏🏻 पांडुरंग हरि 🙏🏻💐💐*
No comments:
Post a Comment