#कहा_करू_जग _देखत_अंधा !!

*कहा करू जग देखत अंधा* ।
*तजि आनंद बिचारै धंदा* ॥
*पाहन अगै देव कटीला* । 
*प्राण नही बाकी पूज रचीला*॥
*निर्जीव आगै सरजीव मारे* ।
 *देषत जन्म आपनौ हारै* ॥
*अंगणि देव पिछौकडि पूजा* ।
 *पाहून पूजि भए नर दुजा* ॥
*नामदेव कहे सुनो रे धगडा* ।
*आतमदेव देव न पूजो दगडा* ॥
                  --- *संत नामदेव*
 
   *या रचनेत संत नामदेव म्हणतात, "हे व दृष्टी असूनही आंधळे आहे. या विसंगतीला काय म्हणावे ? जिवंत देवपण सोडून लोक पहारीने दगड फोडून त्यांची मूर्ती बनवतात. जात चैतन्य नाही अशा देवाची पूजा करतात. दगडाच्या निर्जीव मूर्तीसमोर सजीव मुक्या प्राण्यांचा बळी देतात. खरंतर मानवी जन्माचा अर्थच त्यांनी पराभूत केला आहे. देव आपल्या शरीररूपी घटातच आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून लोक मिरज पाषाणाची पूजा करतात. हे माणसा, देव पण माणसाच्या अंतरंगातच आहे, असे असता तू पाषाणाची पूजा करून स्वतःची फसवणूक का करून घेतो आहेस* ?"
              *संत नामदेव लोकांना खरा देवत्वाची जाणीव करून देत आहेत. लोक नाना प्रकारच्या ग्रामीण दैवतांची पूजा करतात. त्यात दैवतांना जिवंत पशूंचा बळी देतात आणि धर्मकार्य वा तथा तथाकथित कुळाचार केल्याचा आव आणतात. काही लोक जप, तप, अनुष्ठान, पूजा, उपवास यासारख्या कर्मकांडात अडकतात*.
             *संत नामदेव खरेखुरे भक्त होते. ईश्वराचा अंश आपल्या अंतरंगात आहे, हे तत्त्व त्यांना पुरेपूर ठाऊक होते. मूर्तीतला देव ते अंतरीचा देव अशा त्यांच्या जाणिवांचा भक्ती प्रवास प्रगल्भ होत गेला. उत्तर भारतात भ्रमण केल्यानंतर त्यांनी हिंदी रचना केल्या. म्हणजेच या रचना त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या काळातील आहेत. प्रगल्भ अवस्थेतील आहे*.
                 *संत ज्ञानेश्वरांनीही देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ असे म्हटले. आपल्याकडे तेतीस कोटी देव आहेत असे मानले जाते*.
                 *ईश्वर चराचरात आहे हे तत्त्व ही मान्यता पावलेले आहे. ईश्वर वा देव जर चराचरात आहे तर ज्ञानेश्वरांनीही सांगितलेले 'देवाचे द्वार' कुठले ? ते तर आपल्या अवती भवतीच आहे, किंबहुना प्रत्येक माणसात जर ईश्वर तत्त्व वसलेला आहे तर मग प्रत्येक माणूस हाच देवाचे द्वार आहे. देवाचिये द्वारी क्षणभर उभे राहणे म्हणजे एक क्षणभर आपल्या अंतरीच्या आत्मतत्त्वाचा शोध घेणे आहे वा त्या ईश्वरी तत्त्वाची अनुभूती घेणे म्हणजे अवघ्या अध्यात्माचे सार वा केंद्रबिंदू आहे माणूस. जर माणसातच ईश्वर आहे तर मग बाह्य निर्जीव मूर्तीत ईश्वर तत्त्व शोधण्याचा आटापिटा कशासाठी* ?
       *संत नामदेव या शाश्वत सत्याची जाणीव लोकमानसाला करून देत आहेत. आपल्यातल्या ईश्वराला डावलून पाषाणमुर्तीला देव कल्पून त्याला नवस करून मागणे मागायचे आणि त्या बदल्यात आमिष म्हणून पशुबळी द्यायचा आणि देवाचा प्रसाद तो आपण भक्षण करायचा हे सारे काही तर्कहीन, बुद्धिहीन आणि निरर्थक आहे. हा महत्त्वाचा सांगावा संत नामदेव रायांनी या अभंगाद्वारे लोकांना दिला आहे*.
 .
जय जय राम कृष्ण हरि👏🏻👏🏻

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...