वैष्णव 💐💐💐
संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात,
'जाणीव शहाणीव ज्ञातेपण ।
सांडुनी जातीचा अभिमान ।
जो मज होय अनन्यशरण ।
तो जाण वैष्णव माझा ॥'
नामदेव महाराज लिहितात,
' नामा म्हणे नाम केशवाचे घेसी ।
तरीच वैष्णव होसी अरे जना '
तर ज्ञानदेव दुसऱ्या एका ठिकाणी वैष्णवांचे गुण गाताना लिहितात,
नाम नीजधीर गर्जती वैष्णव वीर ।
कळीकाळ यमाचे भार पळाले तेथे ॥'
म्हणजे संतांना अपेक्षित असे वैष्णव तेच जे नामाच्या आनंदात दंग झालेले असतात.
वैष्णवांचे गुहय मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाही ॥
अशा व्यापक रुपाने हरीस जाणणे,व सर्वात्मभावाने त्याची भक्ती करणे,हेच वैष्णवांचे अर्थात वैष्णव धमाचे गुहय म्हणजे रहस्य आहे. संत तुकाराम महाराज...
वैष्णव धर्माच स्वरुप विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
असे व्यापक सांगितले आहे.ज्ञानेश्वर महाराज हरीपाठात वीसाव्या अभंगात हेच सांगतात – नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । ज्ञानेश्वर महाराजांच्या अनंक अभंगातून वैष्णवांची लक्षणे आली आहेत.
सतत कृष्णमूर्ति सावळी ।
खेळे ज्याचे –हदयकमळीं ।
शांती क्षमा तया जवळी ।
जीव भावे अनुसरल्या ॥
अशा व्यापक रुपाने हरीची भक्ती करणे हेच वैष्णवांचे गुहय आहे.तसेच हे हरीचे ज्ञान हाच मोक्षाचाही एकांत म्हणजे एक निश्चय आहे.अंत शब्दाचे निश्चय व नाश असे दोन अर्थ आहेत.एकांत म्हणजे एकत्वाचा निश्चय.मोक्ष ही एक जीवनाची अंतिम स्थिध्दी आहे ती द्वैता विवर्जित अवस्था आहे.जीव,जगत,परमात्मा यांच्यातील जो भेद प्रतीत होतो तो कल्पित आहे.मागे ही कल्पना स्वरुपज्ञानाने नष्ट होते.म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो.मोक्ष हा परमात्मस्वरुपच मानला जातो.जर मोक्षात भेद मानला,तर मोक्षात वस्तूपरिच्छेद म्हणजे सांतत्व मानले जाईल. मोक्षअनित्य होईल.मोक्षवाद्यांनी मोक्ष नित्यच मानला आहे.मोक्ष परमात्मस्वरुपाहून अभिन्न मानला व सांत मानला,तर परमात्माही सांतच होईल.पण तो अनंत म्हटला
आहे.म्हणून महाराज सांगतात
अनंतासी अंत पाहता नाही ॥
अंत शब्दाचा अर्थ नाश असाही होतो.जगात दोन प्रकारच्या वस्तू असून एक नाशवार व दुसरी नाशरहीत आहे्.नाशाचे तीन प्रकार स्वत:,परत:व आश्रय होत.वेदांत शास्त्रात नाशाचा देशत:,कालत:व वस्तुत:हे प्रकार सांगीतले आहेत.सर्व जग हे परमात्मस्वरुपाहून भिन्न राहू शकत नाही,म्हणून त्यांस वस्तू पिरच्छेद म्हणजे अंत नाही.. .
वैष्णवाघरी देव सुखावला ।
बाहीर न वजे दवडोनी घातिला ॥१॥
देव म्हणे माझे पुरतसे कोडा ।
संगती या गोड वैष्णवांची ॥२॥
जरी देव नेउनी घातिला दुरी ।
परतोनी पाहे तव घराभीतरी ॥३॥
कीर्तनाची देवा आवडी मोठी ।
एकाजनार्दनी पडली मिठी ॥४॥