ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी........
नाम हे सुलभ आहे, सहज आहे, सोपेही आहे. तरी सामान्यता माणूस ते घेत नाही. हे सर्व संतांचेच दुःख आहे. नाम कसेही घेतले तरी ते फळते हे जरी खरे असले तरी सद्गदित अंतःकरणाने नामाचा जप केल्यास ते त्वरित फळते. असा नापजप होण्यासाठी नामाचे स्वरूप आणि त्याचा महिमा समजला पाहिजे. हे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. म्हणूनच संत एकमुखाने सद्गुरूमहिमा गातात.
*सद्गुरूवाचोनि नाम न ये हाता ।*
*साधनें साधिता कोटी जाणा ॥*
*संतांसी शरण गेलियावांचोनि ।*
*एका जनार्दनी न कळे नाम ॥*
नामाच्या रूपाने प्रभू आपल्याजवळ आहे. नामस्मरणाने भगवत् कृपा होऊन तो आपला सर्वप्रकारे योगक्षेम वाहतो हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामजप करणे म्हणजेच सद्गदित अंतःकरणाने जप करणे होय.
नाम हे साधन न राहता एक तत्त्वच आहे हे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीतही १०व्या अध्यायात सांगतात,
*अशेषांही वाचा ।*
*आंतु नटनाच सत्याचा ।*
*तें अक्षर एक मी वैकुंठींचा ।*
*वेल्हाळु म्हणे ॥*
*समस्तांही यज्ञांचा पैकीं ।*
*जपयज्ञु तो मी ये लोकीं ।*
*जो कर्मत्यागें प्रणवादिकीं ।*
*निफजविजे ॥*
*नामजपयज्ञु तो परम ।*
*बाधूं न शके स्नानादि कर्म ।*
*नामें पावन धर्माधर्म ।*
*नाम परब्रह्म वेदार्थें ॥*
आपल्या जीवनातील अनुभव हा आहे की साधनाच्या अंगाने जाता साध्य पदरात पडते आणि मग साधन संपते. नामाच्याबाबतीत मात्र असे होत नाही. नाम घेणारा *'मी'* आणि ज्याचे नाम घेतो तो *'भगवंत'* ह्यांचे अद्वैत असते. म्हणून नाम घेता घेता 'मी' भगवंतामध्ये विलीन होतो आणि अखेर नामच शिल्लक उरते. अशी प्रचिती येण्यासाठी मात्र धीर हवा. धीर नसेल तर उतावळेपणाने साधक दृश्यातील प्रचितीच्या मागे जातो. इतर मार्गांत थोडी साधना झाली की छोट्या-मोठ्या प्रचिती येतात आणि साधक त्यांच्याच नांदी लागतो. असे घडू नये म्हणून ज्ञानोबाराय नामधारकांना धोक्याचा इशारा देतांना म्हणतात,
*नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा ।*
*वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥*
नामाचे अंतिम ध्येय काय असावे आणि अनुभूती काय असावी हे सांगतांना ज्ञानोबाराय म्हणतात.
*ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।*
*धरोनी श्रीहरी जपे सदा ॥*
*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।*
*पुण्याची गणना कोण करी ॥*
*पांडूरंगाची माळ घालने म्हणजे काय* ?
*पांडूरंगाची माळ म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजेच कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे*
*साधं*.........
*सोपं*........
*सरळ*.........
*आणि*
*निर्मळ* ..........
*असणं - दिसणं आणि वागणं.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*......
*पांडूरंगाची माळ म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.*
*पांडूरंगाची माळ म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.*
*थोडक्यात पांडूरंगाची माळ म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे
🙏जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment