शिणलो दातारा करिता येरझारा ।


शिणलो दातारा करिता येरझारा | आतां सोडवी संसारापासोनिया ||1||

न सुटेचि बाकी नव्हे झाडापाडा | घातलासे खोडा हाडांचिया ||2||

मायबाये माझी जिवाची सांगाती | ती देतील हाती काळाचिया ||3||

पडताळूनि सूरी बैसला शेजारी | यम फासा करी घेऊनिया ||4||

पाठी पोटी एके लागली सरसी | नेती नरकापाशी ओढोनिया ||5||

जन साह्यभुत असे या सकळा | मी एक निराळा परदेशी ||6||

कोणा काकुलती नाही कोणे परी | तुजविण हरी कृपाळुवा ||7||

तुका म्हणे मज तुझाचि भरवसा | म्हणऊनि आशा मोकलिली ||8||
 अर्थ ---->
हे दातारा पांडुरंगा जन्ममरणाच्या येरझा-या  करता करता मी फार श्रमलो आहे आता या जन्ममरण रूपी संसारातून मला सोडव •||1||

संचित कर्माची बाकी संपत नाही ; त्यामुळे प्रारब्ध कर्माचा हिशोबही पूर्ण होत नाही • त्या योगाने देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे •||2||

माझे मायबाप माझ्या वर्तमान जन्माचे सोबती आहेत पण ते देखील मला काळाच्या स्वाधीन करतील •||3||

यम हा माझ्या आयुष्याचा मेळ पाहुन सुरी परजून व फासे हातात घेऊन माझ्या शेजारी बसला आहे •||4||

ती सुरी एकदम माझ्या पाठी - पोटी लागली असुन ते पाश मला बांधुन मला नरकाकडे ओडुन नेतात •||5||

आणि ह्या सर्व अनर्थाला लोक देखील साह्य करतात अशा परिस्थितीत मी सर्वा पासुन बाजूला पडलेला एकटा परदेशी काय करणार आहे ? ||6||

हे कृपाळू श्रीहरी त्यावेळी तुझ्या वाचून कोणालाही माझी दया येणे शक्य नाही •||7||

तुकाराम महाराज म्हणतात देवा त्यावेळी मला तुझाच एक भरवसा आहे ; म्हणुन मी सर्वाची आशा सोडून दिली आहे •||8||

        🌺विठ्ठल 🌺विठ्ठल 🌺विठ्ठल 🌺
 *पांडूरंगाची माळ घालने म्हणजे काय* ?

*पांडूरंगाची माळ म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजेच कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.* 

*पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*

 *पांडूरंगाची माळ म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.* 

*पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.* 

*पांडूरंगाची माळ म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.* 

*पांडूरंगाची माळ म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.*   

*पांडूरंगाची माळ म्हणजे* 
*साधं*.........
*सोपं*........
*सरळ*.........
*आणि*
*निर्मळ* ..........
*असणं - दिसणं आणि वागणं.*      

*पांडूरंगाची माळ म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*......
*पांडूरंगाची माळ म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.*

*पांडूरंगाची माळ म्हणजे राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.*   

   *थोडक्यात पांडूरंगाची माळ  म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य  कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे

🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...