फळ पिके देंठीं।
निमित्य वारियिची भेटी।।१।।
हा तो अनुभव रोकडा।
कळों येतो खरा कुडा।।२।।
तोडलिया बळें।
वांया जाती काचीं फळें।।३।।
तुका म्हणे मन।
तेथें सकळ कारण।।४।।
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
भावार्थ:-कोणतेंहि फळ देंठाचे ठिकाणीं पक्वदशेला आलें म्हणजे त्याला खालीं पडण्यास एक वाऱ्याची झुळूक पुरी होते.*
*हा सर्वांना प्रत्यक्ष अनुभव आहे,तो खरा किंवा खोटा हें सहज समजतें.*
*पक्व दशेस न येतां कच्चीं फळे जर तोडलीं तर तीं नासून वायां जातात.*
*तुकाराम महाराज म्हणतात,आपल्या एका मनाचे योगानेंच सर्व कार्यसिध्दि होते (धर्माच्या आणि भक्तीच्या योगानें स्थिर झालेल्या मनाला हरि-गुरु-कृपेचें निमित्त मिळालें कीं आत्मसाक्षात्कार होतो; आणि स्वैराचारी मन कच्च्या फळाप्रमाणें फुकट जातें. आपलें मनच कार्यसिध्दिला कारण होतें.).*
कोण होईल आतां संसार पांगिलें॥
आहे उगवलें सहजेंचि||१||
केला तो चालवीं आपुला प्रपंच|
काय कोणां वेच आदा घे दे||२||
सहजेंचि घडे आतां मोळयाविण॥
येथें काय सीण आणि लाभ||३||
तुका म्हणे जालों सहज देखणा॥
ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या||४||
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
भावार्थ:-आमचे संसारबंधन करुणाकराने सहज सोडविले आहे. आता पुन्हा त्यात कोण अडकले ? ज्याने प्रपंच निर्माण केला तोच पुढे चालवील. त्या व्यवहाराशी आपल्याला काही देणेघेणे असण्याचे काय कारण जसे जनरीती नुसार आम्ही न करताही तो संसार आता चाललेला आहे.म्हणुनच प्रपंच आपोआप होतो परमार्थ करायला खुप अडचणी उभ्या असतात. तसेच त्यांच्या म्हणण्या प्रमाणे संसारात आम्हाला श्रमही नाहीत व लाभ ही नाही.जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याच्याकडे सहज पाहत राहिलो तेव्हा आपण निर्माण केलेल्या प्रपंचाचे स्वरूप खोटे असल्याच्या खुणा त्याने मला दाखविल्या.म्हणुन त्यात हरिचिंतन सर्व श्रेष्ठ आहे.
🌷🌷शुभ सकाळ 🌷🌷
श्री शंभो शिवशंकरजींच्या चरणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment