कृष्ण गाता गिती कृष्ण ध्याता चित्ती ।

   *कृष्ण गाता गीती कृष्ण ध्याता चित्ती।*
     *तेही कृष्ण होती कृष्णध्याने।।१।।*

     *आसनी शयनी भोजनीं जेविता।*
     *म्हणा रे भोगिता नारायण।।२।।*

     *ओवीया दळणी गावा नारायण।*
     *कांडिता कांडण करिता काम।।३।।*

     *नर नारी याति हो कोणी भलती।*
     *भावें एका प्रीतीं नारायणा।।४।।*

     *तुका म्हणे एका भावे भजा हरि।*
     *कांति ते दुसरी रूप एक।।५।।*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
     *भावार्थ:-कृष्णाला गीतात गाइल्याने आणि कृष्णाचे चित्तात ध्यान केल्यानें भक्ताला कृष्णरूपता येते.*
     *आसनावर बसल असताना,अंथरुणावर निजले असताना व अनेक भोग भोगीत असताना, अरे, तू नारायणाचे स्मरण कर.*
     *दळीत असताना नारायणाच्या ओव्या गा; कांडीत असताना व अनेक कामे करताना नारायणालाच गावे.*
     *पुरुष व स्त्रिया,त्या कोणत्याही जातीच्या असोत,त्यांनी एकनिष्ठभावाने नारायणावर  प्रीती ठेवावी.*
     *तुकाराम महाराज म्हणतात,एकनिष्ठभावानें तुम्ही हरिचे भजन करा,म्हणजे तुमची हरीशी, सूर्य व त्याची कांति हे दिसण्यात दोन असून ज्याप्रमाणे एकच आहेत त्याप्रमाणे,एकरूपता होईल.*

   *🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*

   *⛳⛳🙏🏻 राम कृष्ण हरि🙏🏻⛳⛳*

    *💐💐🙏🏻पांडुरंग हरि🙏🏻💐💐*

No comments:

विठ्ठल

वैष्णव 👏🏻👏🏻💐💐

वैष्णव 💐💐💐 संतांची 'वैष्णव' ह्या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. भागवतात एकनाथ महाराज लिहितात, 'जाणीव शहाणीव ज्ञातेपण । सांडुनी जा...