*भक्त विठोबाचे भोळे*
*भक्त विठोबाचे भोळे ।
त्यांचे पायी ज्ञान लोळे ॥
भक्तिविण शब्दज्ञान ।
व्यर्थ अवघे ते जाण ॥
नाही ज्याचे चित्ती भक्ती ।
जळो तयाचिु व्युत्पत्ति ॥
नामा म्हणे ऐसे जाण ।
नाही भक्तीसी बंधन ॥
*>-----> संत नामदेव.*
*>------> या अभंगात संत नामदेव विठ्ठल भक्तांचे वर्णन करित आहेत. ते म्हणतात, "विठ्ठलाचे भक्त साधे, सरळ, भोळे आणि निरागस असतात. ते साधेसुधे दिसत असले तरी ज्ञान त्यांच्या पायी लोळण घेत अाहे. त्यांचे अंतरंग भक्ती आणि ज्ञान यांनी परिपुर्ण आहे. जिथे भक्ती नाही तिथे सर्वकाही व्यर्थ आहे. भक्तिविना असलेले तथाकथित व्युत्पन्न पांडित्यही काही कामाचे नाही. भक्ती हे सर्वश्रेष्ठ तत्व आहे. भक्तीचे आकाश अथांग, अनंत असते. त्याला कुठलेही क्रृत्रिम बंधन अडवू शकत नाही."*
*>-----> अमोल डोके.*
No comments:
Post a Comment