🙏जोडोनिया धन उत्तम व्यवहारे 👏
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे /
उदास विचारे वेच करी //१// उत्तमची गती तो एक पावेल / धृ/
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांनी या अभंगातुन स्वधर्माचा, धन, मान कमावण्याचा वगैरे विचार सांगितला आहे .
प्रथम चरणाचा विचार करतांना चार मुद्दे करुन त्यांचा विचार करावा लागेल .
१) धन मिळविणे .
२) धन मिळविण्यासाठी करीवयाचा उत्तम व्यवहार करणे .
३) धन मिळविल्यी नंतर धना विषयीची उजासीनता असणे ,आणि
४) मिळविलेले धन विचार पुर्वक खर्च करणे .
याचा विचार करुन कोणी चांगल्या त-हेने पैसा मिळवुन तोचांगल्या मार्गाने जर खर्च करील तर त्याला उत्तम गती मिळेल म्हणजे चांगल्या योनि मघ्ये जन्म मिळेल व त्याला उत्तम भोग भोगायला मिळतील .
प्रथम आपण वरील चार मुद्याचा विचार करु या .
१) धन मिळविणे - जो गृहस्थाश्रमी असतो त्याने धन्य अवश्य मिळविलेच पाहीजे .
प्रपंच- संसार म्हटल की त्याला पैशाची गरज असतेच. जसे शरीरात पित्त, परमार्थात चित्त, तसे संसारात वित्त - धन असावेच लागते .
ऐसा कोण आहे हे जया नावडे / कन्या पुत्र घोडे दारा धन //
सन्यास्यांनी भिक्षा मागावीच. त्याला व ब्रह्मचारी यांना भिक्षा मागण्याचा आधिकार आहे पण गृहस्थाश्रमिला नाही म्हणुन त्याने धन कमवावे , कारण धना शिवाय प्रपंच होवु शकत नाही .
अधर्माने मिळविलेला पैसा हा दु:खाला कारण असतो व स्वधर्माने मिळविलेला पैसा हा सुखकारक असतो .
म्हणुन तुकोबाराय म्हणतात " जोडोनिया धन "
२) आता उत्तम व्यवहार पाहु .
उत्तम व्यवहार कोणता ?
अशी एक म्हण आहे ,' उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी .
पण शास्त्रा मध्ये शेती करणे उत्तमच, व्यापार करणे उत्तमच आणि नोकरी करणेही उत्तमच आहे फक्त ते करतांना त्याचा पाया नीतीचा व धर्माचा असायला पाहीजे .
आघिक नफा घेवुन माल विकणे अनैतीक , नोकरीत आडवा ऊभा हात मारणे अनैतिकच आहे . ज्याच्या वाट्याला जी सेवा आली ती इमाने इतबारे , योह्य रितीने करणे म्हणजेच उत्तम व्यवहारे होय .
तात्पर्य , जे मिळवायचे ते स्वधर्माने चांगला व्यापार करुन मिळवावे . म्हणुन तुकोबाराय म्हणतात ,
" उत्तम व्यवहारे "
३) उदास - धन खर्च करीत असतांना उदास होवुन खर्च करावे असे महाराज म्हणतात.
पण उदास म्हणजे काय ?
वस्तु आपली नाही अस कळाल की मानुस त्या वस्तु विषयी उदास असतो.
धनाच्या ठीकाणी मानसांची अनुकुल बुद्धी असते म्ह्नुण धन आपलेच आहे असे तो समजतो . म्हणुन धन्य सत्य नाही, टिकावु नाही , आपल्या जवळ राहणारे नाही असे कळाले की, धना विषयीचे ज्ञान मिथ्यात्वाने कळते हा तो आपोआपच धना विषयी आसक्ती नाहीसी होते व तो उदास होतो .
४) वेच करी - खर्च करी - वर प्रमाणे स्वधर्माने मिळविलेला पैसा तो स्वधर्मातच खर्च व्हावा नव्हे स्वधर्मासाठीच खर्च करावा.
नाही तर त्या धनाचा नाश करणारे पांच जण आहेत तीकडे तो नाश होतोच .
दायाद चोर राजा आगी / अधर्म रोग संचरे अंगी / हे पाच जण विभागी / द्रव्य नाशालागी पावती / ए. भा. २३ - १२१
भाऊबंद, चोर, राजा, अग्नी, व रोग हे होत.
देवाने दिलेल्या संपत्तीच्या योगाने जर धर्म कार्य केले नाही, देवाची सेवा केली नाही , धन योग्य रितीने खर्च केले नाही तर मिळालेले ऐश्वर्य नष्ट होईलच होईल . म्हणुन तुकोबाराय म्हणतात , "वेंच करी "
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे / उदास विचारे वेंच करी /१/ उत्तमची गती तो एक पावेल / उत्तम भोगील देवखाणी / धृ //
No comments:
Post a Comment